Friday 24 August 2012

अस्तित्व माझ्या सावलीचे...


तिच्या सोबत चालताना...
माझी सावली अचानक हरवली...
मला वाटले आपले अस्तित्वच संपले ...
पण तिच्या सावलीनेच माझ्या सावलीला होती दडवली....

-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री ०३:०३

तिचा विचार करताना...


तिचा विचार करताना...
स्वतःलाच विसरलो...
घायला मनाला समजवताना...
तिच्या आठवणींत विसावलो...
 
-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री :३८

मैत्री


आपली सखी रात्र येताच....
रातराणीला हि कळते....
रातराणी अशी फुलते...
जणू भेटीच्या सुगंधात दरवळते...

-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री १२:५५

कुणीच माझे ऐकेल नाही...


मर्म मनातले...
देवाला सांगून दमलो...
तुटणाऱ्या तार्याच्या...
वेड्या आशेत पडलो...

शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री :३२